
Gaajar Halwa Recipe & Sairat Marathi Movie Review
Gaajar Halwa is one of those desserts which define Indian Sweets. This delicious, rich carrot pudding loaded with nuts and dried fruits is well-known all over the world.
Making gaajar ka halwa requires lot of grating of carrots and this task used to refrain me from making it. But i found a shortcut by adding them into food processor and they are perfectly grated
Hot Gaajar ka halwa with vanilla icecream tastes heavenly. It is a very common dessert in Indian weddings. You won’t believe me but this was the 1st time I made gaajar ka halwa in US and it turned out great!
Here is the recipe
Ingredients
1 kg (just over 2 pounds) of fresh grated carrots
2 tins (400 gms each) sweetened condensed milk
1 cup full-cream milk
1 cup sugar
1 cup ghee
200 gms khoya (thickened milk)
75 gms almonds blanched and slivered
75 gms pistachios slivered (for a garnish)
edible silver for garnish
Method
Mix the carrots, condensed milk, milk and sugar in a large pan and cook on a medium flame till all the milk thickens and reduces.
Add the khoya and ghee to the carrot-milk mix and fry till the carrots turn a to dark orange color.
Add the almonds and pistachios, mix well and turn off fire. Garnish with edible silver
Allow the halwa to cool slightly and serve in bowls with a dollop of vanilla icecream each.
Recipe Source: http://indianfood.about.com/
It’s very rare that I share personal stories on my blog posts but today I am going to share a review about this marathi movie which i saw over the weekend.It was worth writing a review. Name of the movie is Sairat.
Here is my review in Marathi
सैराट झालं जी….
मी आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाबद्दल एवढा तपशीलवार रिव्ह्यू लिहिला नाही. बट सैराट डीझर्व्ह्स एवरी मेन्शन एंड अप्लौस.
सैराट चित्रपट हा मराठी सिनेमासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. कॅलिफोर्नियाला मूव झाल्यापासून मी कधीच मराठी सिनेमा थिएटरमध्ये बघितला नाही . शनिवारी मैत्रिणीसोबत सहज मजा म्हणून मिल्पीटासच्या सेरा थिएटरमध्ये हा चित्रपट बघायला गेले, काहीही अपेक्षा न ठेवता. सैराट चालू झाला आणि एकाही क्षणाला मी स्क्रीन वरून नजर बाजूला केली नाही.
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचा निरागस आणि उत्कृष्ट अभिनय, डोळे दिपवून टाकणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमटोग्राफी, हृदयाला स्पर्श करणारं अजय-अतुलचं संगीत आणि नागराज मंजुळे ह्यांचे जगावेगळे दिग्दर्शन ह्याने मी भारावून गेले. सैराट झालं जी ह्या गाण्याचं म्युझिक आणि लिरिक्स एवढं भारी आहे की अंगावर काटा येतो. झिंग झिंग झिंगाट गाणे लागताच थिएटरमध्ये सगळी पोरं बेभान स्क्रीन समोर येउन नाचायला लागली . असे सलमान खानच्या मुवीज मध्ये होते हे मी ऐकलं होतं पण मराठी चित्रपटाच्या गाण्यासाठी पहिल्यांदा बघितले. आणि कौतुक म्हणजे अमेरिकेतसुद्धा लोकं एवढी वेडी आहेत ह्या गाण्यासाठी हे बघून मी चक्कं झाले.
मी स्वतः महाराष्ट्राच्या मुंबईत वाढलेली आहे आणि दरवर्षी माझ्या गावी पंढरपूरला जायचे. मराठा समाजातल्या एकूणएक गोष्टी मी अनुभवल्या आहेत. चित्रपटातील एक एक दृश्य, एवढ कसं काय रीएलीस्टिक असू शकतं हाच प्रश्नं मला वारंवार पडत होता. हफ्श्यवरचं पाणी पिणं, ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणं, उसाच्या शेतामध्ये फिरणं, विहिरीत उड्या मारणं, मराठा असण्याचा अभिमान, गावठीपण , प्रेमळ भाषा, पाटीलांचा तोरा, नदीतून मासे पकडणं आणि कित्येक गोष्टी रिलेट करता येत होत्या. नेहमी कोरडा आणि रखरखीत समजला जाणारा महाराष्ट्र एवढा सुंदर दिसू शकतो हे पहिल्यांदा जाणवला.
सगळ्यात सुंदर, शाबुत आणि बिनधास्त असं अर्ची आणि परश्याचं प्रेम. फक्त प्रेमाने पोट भरत नाही याची जाणीव होऊनही शेवटपर्यंत एकमेकांना साथ देणारे हे दोघे खूप काही न बोलता शिकवुन जातात. तरुण वयात फक्त टाइमपासासाठी प्रेम न करता मनापासून प्रेम कसं करतात हे ह्या जोडीने एवढ्या सहजपणे दर्शवलं. हा ह्या दोघांचा पहिला चित्रपट आहे असा एका क्षणालाही वाटत नाही. रिंकू राजगुरू ला नेशनल अवार्ड्स मध्ये सैराट साठी स्पेशल मेन्शन मिळाले एंड इट वाझ सो वेल डीझर्व्हड.
सैराट ही नुसतीच एक प्रेम कहाणी नसून समाजातल्या पाशवी हॉनर किलिंग कृत्याची टीका करते. जातीच्या नावाखाली माणूसकी विसरलेल्या लोकांसाठी हा एक डोळे उघडणारा चित्रपट आहे. चित्रपटाचा शेवट तुम्हाला जागच्या जागी स्तब्ध करून सोडतो
शेवटी सैराटने मला नक्कीच मराठी सिनेमाच्या प्रेमात पाडले…एकदातरी नक्की बघा
Here is the glimpse of the Sairat Movie craziness at Sierra Theatre of Mitliptas in California